लांजा तालुक्यातील एस.टी. कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे आंदोलन
राष्ट्रवादी काॅग्रेस पार्टी लांजा येथील पदाधिका-यांनी लांजा आगारातील कामगारांच्या वेतनाबाबत प्रदेश चिटणीस अजित यशवंतराव यांच्या मार्गदर्शनाखाली एसटी बंद आंदोलन करण्यात आले. यात प्रमूख मागणी TS व TTS कामगारांना कोरोना काळातील जुलै ते सप्टेंबर पर्यंतचा कोणत्याही रजा न वापरता वेतन मिळाले पाहीजे. तसेच TTS कामगारांना प्रसाशनाने काम न दिल्यामुळे त्यांना कामगार नियमाप्रमाणे पुर्ण वेतन दिले पाहिजे.
या सर्व मागण्यासाठी आंदोलन करण्यात आले होते .सकाळी 7 वाजल्यापासून आंदोलन सुरू करण्यात आले होते. राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे जिल्हा सरचिटणीस अभिजीत राजेशिर्के यांनी कामगारांच्या प्रश्नांना मार्गी लावल्याशिवाय आंदोलन मागे घेतले जाणार नाही असा इशारा प्रशासनाला दिला होता.
यावेळी आगार प्रमुख संदीप पाटील यांनी मध्यवर्ती कार्यालयाकडून कामगारांचे पगार काढण्यासाठी प्रयत्न केले जातील असे लेखी आश्वासन दिल्यानंतर राष्ट्रवादी कॉग्रेस कडून 10 वाजता हे आंदोलन मागे घेण्यात आले. राष्ट्रवादी काॅग्रेस पार्टीने आंदोलन मागे घेतले आहे. परंतु सदर मागण्यांची पुर्तता लवकर न झाल्यास तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा दिला आहे.
यावेळी वक्ता सेल जिल्हाध्यक्ष सचिन जाधव, जिल्हा सरचिटणीस अभिजित राजेर्शिके, युवक तालुकाध्यक्ष बाबा धावणे, खजिनदार संजय खानविलकर व इतर कार्यक्रर्ते उपस्थित होते.

Comments
Post a Comment