निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाच्या महाराष्ट्र प्रमुख संघटक पदी श्री .प्रफुल्ल प्रमोद रेळेकर यांची निवड
निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाच्या महाराष्ट्र प्रमुख संघटक पदी श्री .प्रफुल्ल प्रमोद रेळेकर यांची निवड करण्यात आली. पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाचे महाराष्ट्र अध्यक्ष श्री. आबासाहेब राजाराम मोरे ,कार्याध्यक्ष श्री. विलासराव महाडिक यांनी ही निवड केल्याची घोषणा करून श्री प्रफुल्ल रेळेकर यांना निवडीचे पत्र देण्यात आले .कंपन्यांमधील प्रदूषण कमीत कमी कसे करता येईल याकडे गांभीर्याने लक्ष देऊन कंपन्यांशी सहकार्याची भूमिका ठेवून, सर्व स्तरातून पर्यावरण पूरक असे सामाजिक कार्यक्रम घेण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला .
या निवडीबद्दल ज्येष्ठ समाजसेवक श्री. अण्णा हजारे तसेच आमदार श्री. शेखर निकम यांनी श्री .प्रफुल्ल रेळेकर यांचे फोनवरून अभिनंदन केले तसेच भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या .या निवडीबद्दल श्री. प्रफुल्ल रेळेकर यांच्या वर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
शिवतर, खेड मार्गावरील शेकडो झाडे जमीनदोस्त झाल्यामुळे पर्यावरण प्रेमी मधून नाराजी व्यक्त करण्यात आली. ही झाडे तोडण्याची परवानगी देणार्या अधिकारी विरोधात न्यायालयीन लढा उभारणार असल्याचे खेड शहरातील प्रतीत यश विधी तज्ञ ॲड. संदेश चिकणे यांनी सांगीतले. त्याची दखल निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाचे महाराष्ट्र प्रमुख संघटक श्री. प्रफुल्ल रेळेकर यांनी घेतली असून या बातमीला दुजोरा देत महाराष्ट्र संघटक श्री प्रफुल रेळेकर यांनी आपल्या पर्यावरण व प्रदूषण मंडळाचा ॲडव्होकेट संदेश चिकणे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. तसेच वेळोवेळी त्यांना पर्यावरण व प्रदूषण मंडळाचे सहकार्य मिळेल असेदेखील ते बोलले. पर्यावरण हा बाबतीत नागरिक दक्ष असल्याचे पाहून श्री. प्रफुल्ल रेळेकर यांनी समाधान व्यक्त केले.


Comments
Post a Comment