गुहागरमधील हॉटेल अन् किनारे पर्यटकांविना ओस
गुहागर हा कोकणातील समुद्रकिनाऱ्यांपैकी एक समुद्र किनारा, चिपळूणपासून 30 किलोमीटर अंतरावर असलेला अथांग समुद्रकिनारा, अशी याची ओळख आहे. जवळच्या जवळ हा किनारा असल्यामुळे इथे येणाऱ्या पर्यटकांची नेहमीच वर्दळअसते. या समुद्रकिनाऱ्याला लागूनच वेलदूर, असगोली आणि धोपावे बंदर असल्याने याचा दर्जा अधिकच उंचावतो.
इअर ऐंडींगला तर लांब कुठेही न जाता जवळच्या गुहागरच्या समुद्रकिनाऱ्यावर फुल टू धमाल मौजमस्ती करण्यासाठी पर्यटक गुहागरचा समुद्रकिनारा निवडतात. किनाऱ्यावर आलेल्या पर्यटकांमुळे इथले छोटेछोटे व्यावसायिकांची उलाढाल मोठ्या प्रमाणात होते, मात्र आता पर्यटनाचा हंगाम सुरु झाला तरी गुहागरला पर्यटक आलेले नाहीत. केवळ स्थानिक लोक किनाऱ्यावर दिसत आहेत. किनारे पर्यटकांविना ओस असल्याने याचा फटका स्थानिक हॉटेल व अन्य व्यावसायिकांना बसला आहे.

Comments
Post a Comment