परतीच्या पावसाने भातशेतीचे नुकसान


परतीच्या मुसळधार पावसाने भातशेतीला दणका दिला आहे. शनिवारी सांयकाळपासून सुरु झालेला पाऊस रविवारीही होता. त्यामुळे कापलेलं भात मळ्यात साचलेल्या पाण्यावर तरंगत आहे. पावसाचा जोर कायम राहील्यास शेतीचे मोठे नुकसान होईल, अशी भिती शेतकरी व्यक्त करत आहेत. दोन दिवसात झालेल्या सततच्या पावसाने शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले असून त्याचे पंचनामे करावेत, अशी मागणी शेतकर्‍यांकडून केली जात आहे.



Comments