ग्रंथालय सुरु करण्याबाबत आठवड्याभरात निर्णय
लॉकडाऊनंतर ग्रंथालयं सुरु करण्यासंदर्भात आठवडाभरात नोटीफिकेशन काढणार असल्याचं उदय सामंत यांनी सांगितलं आहे. वेगवेगळ्या ग्रथालयांच्या विश्वस्तांनी आज कृष्णकुंजवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आणि या भेटीसंदर्भात राज ठाकरे यांनी उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याशी बातचित केली. यावेळी ग्रंथालयं सुरु करण्यासंदर्भात आठवडाभरात नोटीफिकेशन काढणार असल्याचं ना. उदय सामंत यांनी राज ठाकरे यांना सांगितलं आहे.

Comments
Post a Comment