माळनाका थिबापॅलेस रोडवर गटाराचे पाणी. नगरपालिकेचे दुर्लक्ष; तातडीने दखल घ्या स्थानिकांची मागणी

 रत्नागिरी :- रत्नागिरी शहर परिसरातील माळनाका शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असणारे हे ठिकाण शासकीय विश्राम गृह समोर, सनस्टार हॉटेल शेजारी असणारे गटार हे अनेक महिन्यांपासून रस्त्यावर वाहत आहे. अनेकांनी ही बाब पालिकेच्या लक्षात आणून दिली आहे विशेष म्हणजे हा रस्ता कलेक्टर यांच्या बंगल्याकडे जातो त्यामुळे व्हीआयपी रोड मानला जातो. गेली अनेक महिने हे गटार असेच वाहत असून रस्त्यावर देखील शेवाळ आले आहे. परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य पसरत चालले आहे. हे गटार अनेकदा पालिकेने रस्ता खोदून साफ करण्याचा प्रयत्न देखील केला असल्याचे नागरिकांनी सांगितले. मात्र यावर कायमस्वरूपी उपाय काढण्यात पालिकेला यश आले नसल्याचे आज पर्यंतची परिस्थिती पाहता कळते. पावसाच्या कालावधीमध्ये वाहते गटार शक्यतो…

Comments