फेक टीआरपी प्रकरणी मुंबई पोलिसांकडून गुन्हा दाखल


खोट्या टीआरपी प्रकरणात मुंबई पोलिसांना दिवसेंदिवस अधिक माहीती आणि पुरावे सापडत आहेत. सध्या फक्त मराठी, बॉक्स सिनेमा आणि रिपब्लिक टीव्ही या प्रमुख तीन चॅनेल आरोपीच्या पिंजऱ्यात आहेत. तसेच यात आणखी संशयीत असण्याची शक्यता मुंबई पोलीस महासंचालक परमबीर सिंह यांनी व्यक्त केली होती. यामध्ये आता इंडिया टुडेचं नाव देखील समोर आलंयहंसा कंपनीचे माजी कर्मचारी विशाल भंडारी यांनी बार्कच्या अंतर्गत चौकशीदरम्यान ऑडीट टीमसमोर इंडीया टुडेच्या नावाचा उल्लेख केला. 

परेल येथील BARC च्या ऑफीसमध्ये १७ जूनला याप्रकरणी चौकशी झाली होती. मुंबईतील घरांमध्ये असलेल्या बरोमीटरवरुन कमीत कमी ५ जणांनी इंडिया टुडे रोज किमान २ तास पाहीले तर त्यांना हंसा कंपनीचा माजी कर्मचारी विशाल भंडारीकडून कमीशन मिळेल असे सांगण्यात आले. नोव्हेंबर २०१९ ला विनय त्रिपाठी नावाच्या इसमाला विशाल भंडारीने फोन करुन ही माहीती दिली होती.  विनयने विशालकडून प्रत्येक पाच घरामागे २०० रुपये म्हणजे (एकूण हजार रुपये) आणि त्याचे ५ हजार इतके कमीशन घेतले. त्यानंतर विशालने वेगवेगळ्या नंबरवरुन फोन करत नोव्हेंबर २०१९ पासून मे २०२० पर्यंत हे सुरु ठेवलं. 

BARC च्या टीमने पाचही पत्त्यांवर जात चौकशी केली आणि हे आरोप खरे असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर विशानले हंसा कंपनीच्या नोकरीचा राजीनामा दिला.क्राईम इंटेलिजन्स ब्यूरोने आतापर्यंत लोकांकडून केलेल्या तपासात रिपब्लीकचे नाव समोर आलंय. व्यक्ती किंवा संस्था कितीही मोठी असो, जर यात त्यांचा सहभाग असेल तर त्यांची चौकशी होऊन कारवाई केली जाईल, अशी माहिती पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी दिली.काही चॅनेल बंद असताना सुरु ठेवण्यात आली. रिपब्लिक प्रमोटर्स जाळ्यात सापडले आहेत. रिपब्लिकच्या खात्यांची चौकशी होणार आहे, अशी माहिती मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

टीआरपी वाढवण्यासाठी

- टीआरपी रेटींग कंपनीच्या काही कर्मचाऱ्यांना लाच दिली

- टीआरपी मशिन असलेल्या घरांना पैशांचे आमिष दाखवले

- विशिष्ट चॅनेल दिवसभर सुरु ठेवण्यासाठी महिन्याला ४०० ते ५०० रुपये दिले

- वाढलेल्या टीआरपीमुळं जास्त दरानं जाहिराती मिळवल्या

- महागड्या जाहिरातीतून कोट्यवधींचा अवैध नफा चॅनेल्सनी कमावला

गेल्या काही दिवसांपासून आमच्या अनेक केसे संदर्भात आम्ही माहिती दिली होती. खोटी माहिती पसरवली जात होती. सोशलमीडियावर फेक अकाऊंट फॉल्स टीआरपीचा रॅकेट पुढे आले आहे. देशात २००० बॅरोमीटर लावण्यात आले आहे. बॅरोमीटर लावण्याचे आणि दुरुस्तीचे काम हंसा कंपनीकडे  देण्यात आले होते. हंसा कंपनीचे माजी कर्मचारी बॅरोमीटर असणाऱ्या घरांची माहिती पुरवत असे हेच कर्मचारी लोकांना पैसे देऊन काही खास चॅनल लावायला सांगत होते, अशी माहिती मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी दिली.प्रकरणी दोन व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. त्याच्या खात्यातून २० लाख रुपये मिळाले आहेत, तसेच ८ लाख रुपये जप्त केले आहेत. फक्त मराठी, बॉक्स सिनेमा या चॅनलच्या मालकांना ताब्यात घेण्यात आले आहे. बीएआरसीने दिलेल्या  रिपोर्ट नुसार रिपब्लिक टीव्हीचे प्रमोटर, कर्मचारी यासगळ्यात अडकले असलण्याची शक्यता आहे. जाहिरातींमधून टीव्ही चॅनलचे फंड यातून उघड झाले आहेत.

Comments