रत्नागिरी राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाने दारु बंदी सप्ताहात केल्या कारवाया


राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिक्षक डॉ.बी.एच.तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली दारुबंदी सप्ताह २०२० मध्ये निरिक्षक, भरारी पथक रत्नागिरी कार्यालयाने रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर, संगमेश्वर, लांजा, राजापूर, रत्नागिरी आणि चिपळूण या तालुक्यात दारूबंदी गुन्ह्याकामी छापे टाकून १६ गुन्हे नोंदवून ११ आरोपींना दारूबंदी गुन्ह्यांतर्गत अटक केली. 

दारूबंदी गुन्ह्यातील मोठ्या प्रमाणात गावठी हातभट्टी दारु जप्त करण्यात आलेली आहे. यामध्ये ८०,७८० किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदरच्या कारवाईत भरारी पथक विभागाचे निरिक्षक शरद जाधव, दुय्यम निरिक्षक किरण पाटील, सुनिल सावंत, जवान सागर पवार, निनाद सुर्वे, वाहन चालक विशाल विचारे व महिला जवान अनिता नागरगोजे यांनी भाग घेतला.

Comments