कोरोनापासून बचाव करायचाय, तर 'हे' कराच
मागील काही महिन्यांपासून coronavirus कोरोना व्हायरसचं संकट अधिक गडद होताना दिसत आहे. पण, संकटाच्या या काळातही संपूर्ण जगातील अनेक प्रशासनं आणि आरोग्य संघटना या विषाणूवर मात करण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करत आहेत. सध्याच्या घडीला जवळपास संपूर्ण जग कोरोनाच्या विळख्याखाली आहे. जणू सारं जगच या विषाणूविरोधातील युद्ध लढत आहे.
ही सर्व परिस्थिती आणि कोरोनाविरोधात सुरु असणारा लढा नजरेत घेत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अत्यंत महत्त्वाचा सल्ला सर्वांना दिला आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं प्रसिद्ध केलेला एक व्हिडिओ शेअर करत कोरोनापासून दूर रहायचं असे तर, नेमकं कराव तरी काय आणि कसं, या प्रश्नांची उत्तरं त्यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून दिली आहेत.
जागतिक आरोग्य संघटनेच्या वतीनं प्रसिद्ध करण्यात आलेल्या या व्हिडिओमध्ये कोरोनापासून दूर राहण्यासाठीचे सात सोपे उपाय सुचवण्यात आले आहेत.
- वारंवार हात स्वच्छ धुवा.
- डोळे, तोंड आणि नाकाला स्पर्श करणं टाळा.
- खोकताना कोपराच्या किंवा रुमालाच्या सहाय्यानं तोंड, नाक झाका.
- गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळा.
- साधा सर्दी ताप असला तरीही घराबाहेर जाणं टाळा.

Comments
Post a Comment