अतिवृष्टीमुळे निवळीतील भातशेतीचे अतोनात नुकसान

 


गेले दोन दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे कोकणातील भातशेतीचे खूप मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे.शेतात राबून कष्टाने उभे राहिलेल्या पिकाचा शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास ऐनवेळी झालेल्या अतिवृष्टीमुळे हिरावून नेल्यामुळे  निवळीतील शेतकऱ्यांच्या भातशेतीचे अतोनात नुकसान झाले आहे.या नुकसनामुळे शेतकरी हतबल झाले असून त्यांना शासनाची मदत मिळावी यासाठी शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी प्रत्येक अडीअडचणीवेळी धाऊन जाणारे, भाजपा तालुका उपाध्यक्ष, स्वराज प्रतिष्ठान संस्थापक श्री संजय निवळकर यांनी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसोबत शेताच्या बांधावर जाऊन नुकसान झालेल्या पिकाची पाहणी केली.

इकोटोकिओ या कंपनी च्या माध्यमातून येथील शेतकऱ्यांचा पीक विमा काढण्यात आला होता.त्या कंपनीचे मॅनेजर श्री प्रवीण रेवणे यांना श्री निवळकर यांनी संपर्क केला असता पंचनामा करण्यासाठी ते तातडीने हजर राहून प्रक्रियेला सुरुवात केली.तसेच शासनाकडून सुद्धा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई मिळावी यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले.यावेळी तलाठी श्री गुशिंगे, कृषी सहाय्यक श्री रांजून, ग्रामसेवक श्री कुंभार ,तंटामुक्ती अध्यक्ष श्री सुतार, सरपंच सौ वेदिका रावणांग, उपसरपंच श्री विलास गावडे, सदस्य श्री सुभाष मालप, पोलीस पाटील श्री शितप आदी प्रशासकीय अधिकारी व प्रमुख ग्रामस्थ उपस्थित होते.

Comments