दापोली खेड या दोन तालुक्यांना जोडणाऱ्या मार्गावर खड्डे मनसे शिष्टमंडळाने वेधले लक्ष


दापोली खेड या दोन तालुक्यांना जोडणारा दापोली खेड मार्गावर नारगोली स्मशानभूमी ते अक्षय नर्सरीआणि वाकवली गावातील श्रीकृष्ण नगर ते वाकवली स्मशानभूमी येथे पावसाळ्यापासून भले मोठे खड्डे पडले आहेत त्याचा त्रास नागरिकांना होत असल्याच्या तक्रारी मनसे तालुका सचिव मयुरजी काते आणि मिलिंद गोरिवले यांच्या कडे आल्या; लगेच मनसे शिष्टमंडळाने उपअभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग दापोली यांची भेट घेऊन सात दिवसांच्या आत वरील मार्गावरील रस्त्यांची दुरवस्था सुधारावी असा अल्टीमेटम दिला;तसे न झाल्यास मनसे दापोली उग्र आंदोलन छेडेल त्यासाठी सर्वस्वी जबाबदार सार्वजनिक बांधकाम विभाग असेल असं निवेदन मनसेच्या शिष्टमंडळाच्या वतीने देण्यात आले.

निवेदन देताना तालुकाध्यक्ष नितीनजी साठे मनविसे जिल्हाध्यक्ष सचिनजी गायकवाड यांच्या नेतृत्त्वाखाली देण्यात आले. यावेळी शहराध्यक्ष राकेशजी माळी, उपतालुकाध्यक्ष मिलींदजी गोरीवले, सरचिटणीस मयूरजी काते, मनवासे तालूकाध्यक्ष अरविंजी पुसाळकर, विभागध्यक्ष सुजितजी गायकवाड, सौरभ आंबेकर, वैभव वेल्हाळ उपस्थित होते.

Comments