मिठाई वापराची अंतिम मुदत असणे बंधनकारक


अन्नसुरक्षा व मानके कायदा 2006 नियम व नियमने 2011 अनुसार अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरण नवी दिल्ली यांचे आदेश दि. 25/09/2020 रोजी जाहीर झालेल्या आदेशा प्रमाणे खुल्या स्वरूपातील मिठाईचा उत्पादन दिनांक दर्शविणे ऐच्छिक तर खाणेस योग्य असलेली अंतिम तारीख दर्शविणे बंधनकारक असल्याचे निर्देशीत केले आहे. यासोबतच विक्रीस ठेवलेल्या मिठाईच्या प्रकारानुसार स्थानिक परिस्थितीनुसार त्याची खाणेस योग्य असणारी अंतिम तारीख ठरवून ती प्रदर्शित करावी असे निर्देशीत केले आहे.

तरी मिठाई विक्रेत्यांनी सदर नियमाचे पालन करणे आवश्यक आहे. सदर नियम ०१/१०/२०२० पासून अंमलात आला आहे. तरी या आदेशाचे मिठाई व्यापाऱ्यांनी मिठाई विक्री करताना काटेकोरपणे पालन करून विक्री करणे गरजेचे आहे. असे रत्नागिरी शहर व्यापारी महासंघाने सूचीत केले आहे.


Comments