या महिन्याच्या अखेरिस लग्नबंधनात अडकणार नेहा कक्कर?
आपल्या आवाजाने तरूणाईला वेड लावणारी बॉलिवूड सिंगर नेहा कक्कर सध्या पर्सनल लाईफमुळे अधिक चर्चेत असते. कधीकाळी नेहा आणि अभिनेता हिमांश कोहली कधी काळी एकमेकांच्या प्रेमात होते. पण अचानक दोघांचे ब्रेकअप झाले. अनेक प्रयत्नानंतर नेहा ब्रेकअपच्या या दु:खातून बाहेर आली. यानंतर ‘इंडियन आयडल 11’च्या सेटवर असा काही ड्रामा रंगला की नेहा उदित नारायण यांचा मुलगा आदित्य नारायणसोबत लग्न करणार, अशा चर्चा रंगल्या. आता पुन्हा एकदा नेहाच्या लग्नाची जोरदार चर्चा आहे. होय, नेहा या महिन्याच्या अखेरिस लग्न करणार असे मानले जात आहे.
‘आजा चल लॉकडाऊन विच व्याह कराइए कट होन खरचे,’ या गाण्यात नेहा व रोहनप्रीत एकत्र दिसले होते. नेहाने अलीकडे तिच्या इन्स्टास्टोरीवर या पंजाबी गाण्याचे बोल पोस्ट केले होते. यानंतर रोहनप्रीतनेही नेहासोबतचा एक व्हिडीओ पोस्ट केला होता. यात बॅकग्राऊंडमध्ये ‘डायमंड द छल्ला’ हे गाणे वाजत होते. व्हिडीओत रोहन नेहाच्या बोटात अंगठी घालताना या व्हिडीओत दिसला होता.
विशेष म्हणजे ज्या शोमध्ये ती जज आहे त्याच शोमधून तिने तिच्या करियरची सुरूवात केली होती. याच शोच्या दुसऱ्या सीजन पासून केली होती. जेव्हा नेहा 11वीमध्ये होती. तेव्हा ती कंटेस्टेंट म्हणून या शो मध्ये गेली होती. या शोमध्ये ती त्यावेळी यश मिळवू शकली नाही. तिल रिजेक्ट करण्यात आलं होतं. तरीही ती खचली नाही. मोठ्या मेहनतीने तिने स्वतःची यशस्वी गायिका अशी ओळख निर्माण केली. नेहा आज बॉलिवूडच्या टॉप सिंगर्सपैकी एक आहे. ती गाण्याचे 10 ते 15 लाख रुपये ती मानधन घेते. एखाद्या सिनेमात तिला गाणे कंपोज करण्यासाठी घेतले गेले तर ती दोन ते तीन लाख रुपये महिन्याला घेते.

Comments
Post a Comment