राजापूरातील शिवाजी पथ रस्त्याच्या कामाला शिवसेना मान्यता देणार का?
राजापूर शहरात सत्ताधारी व विरोधक यांच्यात ठोक निधी वरुन चांगलाच वादंग निर्माण झाला आहे. दरम्यान या वादात शहरातील रस्त्यांचा विकास होणार कसा याबाबत विचारविनिमय होताना दिसून येत नाहिये. राजापूर शहरातील जवाहर चौक-शिवाजी पथ रस्ता-गणेशविसर्जन घाट-राजीव गांधी मैदान या रस्त्यावर मोठमोठे खड़डे पडले आहेत. यामुळे नागरीकांना या रस्त्यावरुन जीव मुठीत धरुन प्रवास करावा लागत आहे.
शासनाने ठोक निधी मन्जुर केला असून ही सर्व कामे शिवसेनेच्या नगरसेवकांच्या प्रभागांमध्ये वाटुन घेतला असल्याचा दावा सत्ताधारी करित आहे. शिवाजी पथ रस्त्याच्या डांबरीकरणाबाबत शिवसेनेने विचार करणे आवश्यक आहे. मात्र प्रत्यक्षात तसे होताना दिसून येत नाही. एकुणच रस्त्यांच्या विकासाचा प्रश्न सध्या राजापूर शहरासाठी ऐरणीवर आला आहे.

Comments
Post a Comment