विलवडे येथील ग्रामस्थांनी जीवाची बाजी लावून वाचवली पुरात वाहून जाणारी गुरे
गेल्या आठवड्यात बुधवारी रात्रीपासून मुसळधारपणे कोसळणाऱ्या पावसामुळे मुचकुंदी नदीला मोठा पूर आला होता. विलवडे खामकरवाडी येथे पुराचे पाणी भरले. मुचकुंदी नदीला आलेल्या पुरामध्ये वाहून जाणारी गुरे विलवडे बौद्धवाडीतील ग्रामस्थांनी आपल्या जीवाची बाजी लावून वाचवली. नदीच्या पात्रालगत असलेल्या विलवडे बौद्धवाडीतील सुरेश मोहिते यांची आठ गुरे पुराच्या पाण्यात अडकली होती.
पुराच्या पाण्याने ती वाहून जाण्याचा धोका होता. आठ जनावरांचा जीव वाचवण्यासाठी पहाटेपासून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू झाले. ही जनावरे वाचवण्यासाठी येथील मनोहर खामकर, जनार्दन खामकर, रमेश खामकर यांनी प्रवाहात जीव धोक्यात टाकून आठ जनावरे पाण्याच्या प्रवाहातून वाहून जाताना वाचवली. त्यांच्या या धाडसाचे पंचक्रोशीतन कौतुक केले जात आहे.

Comments
Post a Comment