श्री देवी करंजेश्र्वरीचे मंदिर नवरात्रौत्सव कालावधीत दर्शनासाठी बंद राहणार


गोवळकोट-पेठमाप- मजरेकाशीचे ग्रामदैवत श्री देव सोमेश्वर व श्री देवी करंजेश्वरी देवस्थानमध्ये प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही नवरात्रोत्सव अश्विन शुद्ध प्रतिपदा  शनिवार दि. १७ ऑक्टोबर ते अश्विन शुद्ध नवमी  (दसरा) रविवार दि.२५ ऑक्टोबर २०२०पर्यंत पारंपरिक रूढीप्रमाणे धार्मिक विधी व पूजन, प्रतिवर्षी प्रहर करणारे सेवेकरी (५ जण) यांच्या नित्य उपस्थितीत कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात येणार आहे. शासनाच्या आदेशानुसार सर्व मंदिरे लाॅकडाउन क्रमांक १, दि. २२ मार्च २०२०पासून भक्तजनांना दर्शनासाठी बंद आहेत. 

त्याचप्रमाणे शासनाचा पुढील आदेश येईपर्यंत बंदच राहतील. त्यामुळे नवरात्रोत्सव काळातही भक्तगण - नागरिकांनी याची नोंद घेऊन सहकार्य करावे, अशीविनंती श्री देव सोमेश्वर व श्री देवी करंजेश्र्वरी देवस्थान गोवळकोट-पेठमाप-मजरेकाशी यांनी केली आहे. नवरात्रोत्सव कालावधीत प्रतिवर्षी लोक सहभागाने श्रींचा दर्शन सोहळा, आरती, हरिपाठ, भजन,  सांस्कृतिक कार्यक्रम ईत्यादी सर्व कार्यक्रम कोरोना साथीच्या पाश्र्वभूमीवर शासनाने  दिलेल्या आदेशा अन्वये देवस्थान कमिटी व ग्रामस्थांनी रद्द करून यंदाचा नवरात्रोत्सव साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. 

कोरोना साथीच्या या राष्ट्रीय नैसर्गिक आपत्ती प्रसंगी भक्तगण-नागरीकांनी नवरात्रौत्सव साजरा करताना शासन ओवनियमावलीचा तंतोतंत अवलंब करून सहकार्य करावे, असे आवाहन श्री देव सोमेश्वर व श्री देवी करंजेश्र्वरी देवस्थान विश्वस्त कमिटी व ग्रामस्थांनी केले आहे.

Comments