राजू चा फोन आला आणि संगमेश्वर पोलिसांची दारूची कारवाई थांबली
काही दिवसा पूर्वी संगमेश्वर पोलिसांनी बाजार पेठेत दारू विक्री होत असल्याबाबत काही ठिकाणी धाडी टाकल्या त्या धाडी मध्ये काही ठिकाणी दारू साठा मिळाल्याची चर्चा संगमेश्वरमध्ये जोरदार सुरु होती. पण या धाडी मध्ये एका प्रतिष्टित व्यक्तीच्या घरी काही दारू साठा संपल्याने खळबळ उडाली आणि पोलिसांनी कारवाई करण्याची तयारी दाखवली मात्र पोलिसांच्या वरिष्ठ अधिकारीना एका राजूचा फोन आला आणि झालेली कारवाई रद्द झाल्याची चर्चा संगमेश्वर बाजारपेठेत सुरु आहे.
संगमेश्वर पोलिसा ठाण्याच्या हद्दीत दारू, जुगार, मटका खुले आमा सुरु असताना पोलीस कारवाई का करत नाहीत? आणि कारवाई केलेली थांबते कशी? असे सर्व प्रश्नवर आता बाजारपेठ जोरदार चर्चा सुरु झाली आहे.संगमेश्वर पोलीस या दारू आणि इतर धंद्यावर कारवाई कधी करतील? संगमेश्वर मध्ये आठ दिवसापूर्वी झालेल्या कारवाईला कुणी व कसा ब्रेक लागला? कारवाई थांबवण्यासाठी ज्या राजूचा फोन आला तो राजू कोण? असा सवाल ही आता विचारला जातोय.
येथील दारू हंड्यावर कारवाई करण्यास पोलिस अधीक्षक लक्ष देतील का? असे ही विचारले जात आहे. काही दिवसापूर्वी संगमेशवर पोलिसांनी टाकलेल्या धाडीचे पुढे काय झाले याची वरिष्ठ पातळीवरून चोकशी व्हावी अशी मागणी ही होत आहेत. येथील धंद्याना अभय कोणाचा आहे आणि याचा पाठीराखा कोण? यावर ही उलट सुलट चर्चा आहेत
संगमेश्वर मधील दारू धंदे बंद व्हावेत म्हणून काही सुजाण नागरिकांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना पत्र ही लिहले आहे. ते पत्र कोणी दाबून ठेवले आणि त्यावर कारवाई का होत नाही याची चोकशी पोलीस अधीक्षकांनी करावी.

Comments
Post a Comment