चाफे येथील मंदिरात तोडफोड करणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल


दारूच्या नशेत तालुक्यातील चाफे येथील मंदिरातील देवतांची तोडफोड करणाऱ्याविरोधात जयगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना रविवार ४ ऑक्टोबर रोजी रात्री ११ वा.सुमारास उघडकीस आली. चंद्रकांत रत्नू गावडे (४३,रा.चाफे, रत्नागिरी) यांनी दिलेल्या खबरीनुसार, दिनेश शांताराम जाधव (रा.बौध्दवाडी चाफे,रत्नागिरी) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

त्यानुसार, दिनेश जाधव याने दारुच्या नशेत चाफे येथील मंदिरातील शंकराच्या आणि नंदीच्या मूर्तीची तोडफोड केली. याप्रकरणी बुधवारी जयगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी पुढील तपास जयगड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक भोये यांच्या मार्गदर्शनाखाली मालगुंड पोलिस दूरक्षेत्राच्या उपनिरीक्षक अस्मिता पाटील करत आहेत.

Comments