कु.पायल आंबेरकरचा अटकेपार झेंडा
पूर्णगड (रत्नागिरी) येथील सद्या दापोली येथे रहाणाऱ्या आणि सरस्वती विद्यामंदिर इंग्लिश मिडीयम स्कूल दापोली येथे चौथीत शिकणाऱ्या कु.पायल राकेश आंबेरकर हिने ९ देशांचा सहभाग असलेल्या आंतरराष्ट्रीय टोयाकान कराटे स्पर्धेत गोल्ड मेडल मिळवून दैदिप्यमान असे यश संपादन करुन स्वतः बरोबरच देशाची मान उंचावली आहे.नुकत्याच घेण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत भारत, आॕस्ट्रेलिया, श्रीलंका, नेपाळ,भूतान, बांग्लादेश पाकिस्तान, बेतीन आणि उझबेकीस्तान या देशातील खेळाडूंनी सहभाग दर्शवला होता.
या स्पर्धेसाठी भारतातून एकूण ३०० स्पर्धकांनी सहभाग घेतला. त्यापैकी महाराष्ट्रातून १९९ स्पर्धक सहभागी झाले होते. या अत्यंत महत्वपूर्ण स्पर्धेत पायल आंबेरकर हिने अंडर इलेव्हन गटात गोल्ड मेडल मिळवून नेत्रदिपक असे यश संपादन केले आहे.याआधी घेण्यात आलेल्या नॕशनल लेवलला गोल्ड मेडल मिळाल्याने या आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेसाठी तिची निवड करण्यात आली होती.
या स्पर्धेसाठी शोतोकान कराटे चे महाराष्ट्र राज्याचे व्हाईस प्रेसिंडेंट सुरेंद्र शिंदे सरांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले. या आंतरराष्ट्रीय स्तरावर मिळालेल्या यशाबद्दल परिसरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Comments
Post a Comment