पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजना  अर्ज करण्याचे आवाहन


शेतकऱ्याला दर्जेदार कीड व रोगमुक्त भाजीपाल्याची रोपे तयार करुन देणाऱ्या रोपवाटीका व्यवसायास मोठया प्रमाणावर वाव आहे. भाजीपाला पिकांची दर्जेदार व कीडरोग मुक्त रोपे निर्मिती करुन उत्पन्न व उत्पादनात वाढ करणे, रोपवाटीकेमुळे स्थानिक शेतकऱ्यांना शेतीपूरक व्यवसायाची संधी उपलब्ध करुन देणे, पीक रचनेत बदल घडून आणणे व नविन तंत्रज्ञानाचा प्रसार करणे, शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न व भाजीपाला उत्पादनात वाढ करणे याच उद्देशाने शासनाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजना सन 2020-21 मध्ये सुरु केली आहे. या योजनेतून जिल्हयातील प्रत्येक तालुक्यातून किमान एक दर्जेदार कीड व रोगमुक्त रोपे तयार करण्यास लहान रोपवाटीका उभारण्यास प्रोत्साहन देण्याचा उद्देश आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार शेतकऱ्याकडे स्वत:च्या मालकीची किमान 0.40 हेक्टर जमिन व कायम स्वरुपी पाण्याची सोय असणे आवश्यक आहे. अर्जदारात महिला कृषि पदवीधरांना प्रथम प्राधान्य राहील. महिला गट, महिला शेतकरी यांना व्दितीय प्राधान्य राहील. भाजीपाला उत्पादक, अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी व शेतकरी गट यांना तृतीय प्राधान्य राहील. यापूर्वी शासनाचा लाभ घेतलेले खाजगी रोपवाटीकाधारक, शासनाच्या लाभ न घेता उभारलेल्या खाजगी रोपवाटीकाधारक तसेच राष्ट्रीय कृषि विकास योजना, एकात्मिक फलोत्पादन अभियान, पोकरा किंवा इतर योजनातुन संरक्षित शेती (शेडनेट व हरितगृह) घटकाचा लाभ घेतलेले लाभार्थी पुनश्च सदर योजनेंतर्गत लाभास पात्र राहणार नाहीत.       टोमॅटो, वांगी, कोबी, फुलकोबी, मिरची, कांदा इ. व इतर भाजीपाला पिकांसाठी रोपवाटीकेची उभारणी करण्यात यावी.

इच्छूक शेतकऱ्यांनी Maha-DBT या संकेतस्थळावर ऑनलाईन किंवा आपले संबंधित तालुका कृषि अधिकारी यांच्याकडे 19 ऑक्टोबर 2020 पर्यंत अर्ज करावेत. 

इच्छुक शेतकऱ्यांनी आपले कार्यक्षेत्रातील कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांचेशी संपर्क साधावा.  असे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक, कोंकण विभाग यांनी केले आहे.

Comments