१४ वी "स्वाभिमान भारत कप ऑनलाईन काता स्पर्धेत" रितिका भोसले हिने पटकावले सुवर्ण पदक
इंटरनेशनल इंडो रयू कराटे दो फेडरेशन द्वारा आयोजित १४ वी स्वाभिमान भारत कप ऑनलाईन काता स्पर्धेत रितिका भोसले हिने सुवर्ण पदक जिंकले.कोरोना काळात सर्व नियम पाळून झालेल्या या स्पर्धेत देश भरातून ३५० स्पर्धक सहभागी झाले होते.चार इंटरनेशनल गोल्ड मँडल जिंकलेल्या रितिका भोसले ने या स्पर्धेत असिस्टेंट स्कोरर म्हणून सुद्धा काम केले.फ्राज शेख सरांच्या मार्गदर्शनाखाली रितिकाने हे यश संपादन केले.
या कामी तिचे आई-वडिल व घरचे सर्व सदस्य आवश्यक ते सहकार्यसह प्रोत्साहन देतात असे मत पदक पटकावल्यानंतर रितिकाने व्यक्त केले.रितिकाने पुन्हा एकदा सुवर्ण पदक पटकावल्याबद्दल तीचे विक्रोळी पार्क साईट विभागातील अनेक सामाजिक,शैक्षणिक संस्था,मंडळ यांच्यासह पत्रकार दत्तेश्वर गायकवाड व अन्य मित्र परिवारांतर्फे तिला अभिनंदनासह शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

Comments
Post a Comment