असुर्डेत विनापरवाना बंदूक बाळगल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल



तालुक्यातील असुर्डे येथे विनापरवाना बंदूक व दारूगोळा वापरल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी दुचाकीसह ४१ हजार रुपयांचा मुद्देमाल सावर्डे पोलिसांनी जप्त केला आहे. नयन नंदकुमार साळवी (४२, रा. असुर्डे) व संदीप नारायण जाधव (४२, रा. खेरशेत) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. पोलिस शिपाई राहुल धुमाळ यांनी फिर्याद दिली आहे. 

नयन साळवी व संदीप जाधव हे मंगळवारी मध्यरात्री मुंबई-गोवा महामार्गावरील असुर्डे निर्मळवाडी फाटा येथे दुचाकीवरून जाताना आढळून आले. यावेळी पोलिसांनी तपासणी केली असता ठासणीची बंदूक व दारूगोळा आढळून आला. यानंतर या दोघांवर कारवाई करण्यात आली आहे. अधिक तपास सावर्डे पोलिस करीत आहेत.

Comments