देयके योग्य परंतु विज बिल थकल्यामुळे वीज तोडण्याचे आदेश नाहीत


संपूर्ण जग एका भयानक महा मारीला तोंड देत असताना महावितरण ने उत्तम प्रकारे वीज पुरवठा सुरळीत सुरू ठेवला. यामुळे घरात राहून काम करणाऱ्या सर्वांचे जीवन सुसह्य झाले आहे.  महावितरण कंपनीतर्फे देखील कोरोना चा प्रसार रोखण्याच्या दृष्टीने काही काळ जागेवर जाऊन मीटर रीडिंग घेणे व वीज देयक पाठवणे यास स्थगिती दिली होती.  परंतु मागील दोन-तीन महिन्यांपासून बहुतेक सर्व ठिकाणी विजेच्या वापरासाठी असलेले मीटर रीडिंग घेतले जाऊ लागले आहे.  या  लॉक डाऊन कालावधीतील वीज देयकांबाबत शंकानिरसन करण्यासाठी महावितरण कंपनीने मोठ्या प्रमाणात ग्राहकांशी संवाद साधला आहे.

याअंतर्गत उपविभाग निहाय प्रत्येक कार्यालयाद्वारे वेबिनार चे आयोजन करण्यात आले तसेच ग्राहकांच्या शंकानिरसन  करण्यासाठी सोशल डिस्टन्स सिंगचे पालन करून शंका निरसनासाठी उपविभाग स्तरापर्यंत विशेष ग्राहक थेट-भेट अशा कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते.  याअंतर्गत रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात जवळपास एक लाखापेक्षा जास्त ग्राहकांनी आपल्या शंकांचे निरसन करून घेतले. 

मात्र या प्रक्रियेमध्ये काही भागात तात्पुरत्या स्वरूपात लॉक डाऊन असल्यास अशा ठिकाणी मीटर रीडिंग घेणे अथवा वीज देयक पोचवणे हे विद्यमान संसर्गजन्य आजाराचा धोका लक्षात घेता शक्य होणारे नाही. महावितरण कंपनीने 100% मिटर रिडींग घेण्याचे धोरण स्वीकारले असून वीज ग्राहकांना त्यांच्या वापरानुसार विजेचे देयक देण्यास मागील तीन महिन्यांपासून सुरुवात केली आहे मात्र छापील वीज वितरणामध्ये अद्यापही काही ठिकाणी अडचणी येत असून  महावितरणची ऑनलाइन वीज देयके भरण्याची यंत्रणा अत्यंत सक्षम पणे काम करत आहे. महावितरणची इंटरनेट आधारित प्रणाली वापरून वीज देयक भरणे अतिशय सुलभ व सुटसुटीत झाले आहे. अशा परिस्थितीत आपल्या वीज देयकाचा भरणा वेळेवर केल्यास महावितरण तर्फे देण्यात येणाऱ्या तत्पर भरणा सुट्टीचा फायदा वीज ग्राहकाना निश्‍चितच मिळू शकतो.

महावितरणचे मोबाईल ॲप वापरण्यास सोपे व सुटसुटीत असल्याने त्या माध्यमावर ग्राहकांचा ओढा दिसून येत आहे. सध्याच्या आपत्कालीन परिस्थितीत वीज ग्राहकांनी महावितरण कंपनी कडे आपला मोबाईल नंबर नोंदविल्यास लघु संदेशाद्वारे मिटर रिडींग बाबत तसेच भरणा करावयाच्या देयकाबाबत, लघुसंदेश स्वरूपात माहिती पाठवली जाते. यामुळे आपले मीटर रेडींग वेळीच नोंदविणे , तत्पर देयक भरणा सवलत प्राप्त करणे ग्राहकास सहज शक्य होत आहे. कोकणातील वीज ग्राहक मुळातच आपली थकबाकी होऊ नये यासाठी जागरूक असतात या पार्श्वभूमीवर महावितरणच्या मोबाईल ॲप द्वारे यासंबंधी तक्रारी नोंदवण्यास संबंधी सर्व सेवा व सुविधांचा लाभ ग्राहकांनी घ्यावा असे आवाहन महावितरण कोकण परिमंडळ  मुख्य अभियंता श्री देवेंद्र सायाणेकर यांनी केले  आहे.

Comments