मोदी सरकारच्या शेतकरी विरोधी कायद्याविरोधात रत्नागिरी कॉंग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सूचनेनुसार जिल्हाध्यक्ष अँड विजय भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी व कामगार विरोधी काळया कायद्याला विरोध म्हणून जिल्हा उपाध्यक्ष बरकत काझी व जिल्हा उपाध्यक्ष रमेश शहा यांच्या निरीक्षणाखाली किसान अधिकार दिवस म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रमुख कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. त्यावेळेस मोदी सरकार मुर्दाबाद,शेतकरी विरोधी कायदा रद्द करा अश्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.
तद प्रसंगी महिला जिल्हाध्यक्ष अँड अश्विनी आगाशे,सोशल मिडिया जिल्हाध्यक्ष कपिल नागवेकर,अल्पसंख्यांक सेल जिल्हाध्यक्ष हरीश शेकासन, जिल्हा चिटणीस शब्बीर भाटकर,महिला शहर अध्यक्ष रिजवाना शेख,इम्तियाज मुजावर सचिन मालवणकर, गोतम मॅडम, अली हसन आंबेडकर,अनंत शिंदे उपस्थित होते.

Comments
Post a Comment