संगमेश्वर भाजप, तालुकाध्यक्षांचा कसबा जिल्हा परिषद गटात दौरा
तालुक्यातील कसबा जिल्हा परिषद गटामध्ये भारतीय जनता पक्षाची बांधणी सक्षमपणे व्हावी यासाठी स्थानिक कार्यकर्त्यांच्या सहकार्याने भाजप संगमेश्वरचे तालुकाध्यक्ष श्री. प्रमोदजी अधटराव यांनी एक दिवसीय दौरा केला. या दरम्यान त्यांनी डिंगणी, डिंगणी कुरण, पिरंदवणे आणि फुणगूस या गावांना भेटी दिल्या.
या भेटीदरम्यान तालुकाध्यक्ष सामान्य कार्यकर्त्यांच्या निवासस्थानी प्रत्यक्ष जाऊन भेटले. स्वास्थ्य, कौटुंबिक आणि आर्थिक परिस्थितीची तसेच शेतीची आपुलकीने विचारपूस केली. त्याचप्रमाणे नुकसानग्रस्त शेतकर्यांच्या शेतीची पहाणी व सर्वेक्षण करण्यासाठी शासकीय यंत्रणा आली होती का, पंचनामे व्यवस्थित रीतीने झाले का या सर्व गोष्टींची माहिती घेतली.संघटनात्मक दृष्टीकोनातून गावाची भाजप बरोबर येण्याची स्थिती, गावाच्या आत्तापर्यंतच्या समस्या कोणत्या हे स्थानिक कार्यकर्त्यांकडून जाणून घेतले. स्थानिक राजकारणाची परिस्थिती जाणून घेतली.
यानंतर कार्यकर्त्यांची विविध पदांवर नियुक्ती करून त्यांचा गौरव केला. भाजप हा पक्ष पार्टी विथ डिफरन्स अशी बिरुदावली लावतो याचे कारण या पक्षात सामान्य कार्यकर्तासुद्धा मोठ्या पदापर्यंत जाऊ शकतो हेच आहे. कार्यकर्त्यांनी मरगळ झटकून आक्रमकपणे आणि जिद्दीने कार्य करा असा संदेश द्यायला अधटराव विसरले नाहीत. नवीन नियुक्ती करतानाच तालुका उपाध्यक्ष श्री. मिथुनजी निकम यांनी सर्वांचे अभिनंदन केले व त्यांच्या पक्षातील भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
नियुक्त करण्यात आलेले पदाधिकारी-
दिपकजी चाळके- खाडी विभाग शक्ती प्रमुख,
श्री. विजयजी गुरव- ओबीसी सेल तालुका कार्यकारणी सदस्य,
श्री. मुरलीधरजी चाळके- डिंगणी बूथ प्रमुख,
दिपकजी राऊत- डिंगणी कुरण बूथ प्रमुख,
श्री. किरणजी भोसले- फुणगुस बूथ प्रमुख,
श्री. जयकुमारजी चाळके- युवा मोर्चा तालुका कार्यकारणी सदस्य,
श्री. मयूरजी निकम- युवा मोर्चा तालुका कोषाध्यक्ष,
श्री. राकेशजी चाळके- युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष,
श्री. सचिनजी राऊत- तालुका कार्यकारणी सदस्य.

Comments
Post a Comment