जागतिक अंध काठी दिनाच्या निमित्ताने दिव्यांग श्री. प्रथमेश पडवळ, श्रीम. संपदा कांबळे व पालक सौ. पडवळ यांची मुलाखत


जागतिक अंध काठी दिनाच्या निमित्ताने समाजातील दृष्टी बाधीत दिव्यांग बंधू भगिणी विषयी जाणीव जागृती निर्माण व्हावी जेणे करून त्यांच्या प्रति समाजात संवेदनशीलता निर्माण होईल व समाज त्यांना मुख्य प्रवाहात सामावून घेण्यासाठी पुढाकार घेईल या उद्देशाने दृष्टी बाधीत दिव्यांग बंधू व भगिणी व त्यांच्या कुटुंबियांशी संवाद साधण्यात आला आणि या मुलाखतीचे आयोजन केले होते दिव्यांगांसाठी कार्यरत संस्था आस्था सोशल फाउंडेशन रत्नागिरी व मातृभूमी प्रतिष्ठाण रत्नागिरी या संस्थांनी.

पांढरी  काठी  दिनाच्या निमित्ताने पांढऱ्या काठीची गोष्ट जाणून घेऊया विसाव्या शतकाच्या सुरुवातीला पहिल्या महायुद्धानंतर डॉ.रिचर्ड व्ह्यूव्हर यांनी सर्वप्रथम अंधांना चालण्या फिरण्यासाठी सोयीची पडेल अशी विशिष्ट स्वरूपाची काठी तयार केली ती काठी हूव्हर केन म्हणून ओळखली गेली.1921 मध्ये ब्रिस्टेलचे फोटोग्राफर जेम्स किंज यांना अपघातात अंधत्व आल.तेव्हा गडद रंगाच्या काठ्या घेऊन फिरतांना वाहनचालक आणि इतर डोळस व्यक्तींना दुरून ती ओळखणे कठीण जाते.हे लक्षात आल्यानंतर अंधारातही सहजपणे दिसेल, असा पांढरा रंग या काठीला मिळाला. व पुढे काळानुरूप पांढरी व उर्वरित खालचा भाग लाल फोल्डिंग ची काठी दिव्यांग बांधव आज वापरतांना  आपल्याला दिसतात. जी त्यांच्या साठी जीवन रेखा, व काही प्रमाणात डोळ्यांची भूमिका पार पडते. त्या सोबत समाजातील लोकांनाही कळते की ही व्यक्ती दृष्टी बाधित आहे.

मुलाखतीत सहभागी झाले होते 100% दृष्टी बाधित दिव्यांग श्री. प्रथमेश राजेश पडवळ कला शाखा पदवीधर व अंध क्रिकेटीयर. व 75% दृष्टी बाधीत श्रीम. संपदा विजय कांबळे MA,B.ED ज्या आस्था विशेष गरजा असणाऱ्या मुलांच्या थेरपी सेंटर मध्ये थेरपी सहाय्यक म्हणून मागील 2 वर्षा पासून कार्यरत आहे.पालक प्रतिनिधी म्हणून या मुलाखतीत सहभागी झाल्या होत्या सौ. योगिता पडवळ. या मुलाखतीत प्रथमेश याने त्याच्या विशेष शाळेतील शिक्षणाचा व  संपदाने  सामान्य शाळेतील शिक्षणाचा प्रवास उलघडला.

मुलाखती दरम्यान प्रथमेश ने ब्रेल पाटी ,अंध क्रिकेट बॉल, पांढरी काठी, मोबाईल टॉक बॅक अप्लिकेशन  व मनी अँप इत्यादी दृष्टी- बाधीत कसे वापरतात त्याचे प्रात्याक्षिक दाखवले.

सौ. पडवळ यांनी पालक म्हणून जन्मापासून आतापर्यंत प्रथेमेशला मोठा करताना किती आव्हानांना तोंड द्यावे लागले याबद्दल सांगितले. याप्रसंगी या सर्वांनी अंधत्वाच्या शीघ्र निदान, शीघ्र उपचार, 100% दृष्टी- बधितांसाठी निवासी विशेष शाळा,  समावेशीत शाळेत शिक्षण घेणाऱ्या अल्प दृष्टी विद्यार्थ्यांसाठी लहान वयापासून शस्त्रक्रिया,चष्मे, मॅग्नीफायर, लॅपटॉप, मोबाईल,ब्रेल व इतर अन्य ब्लाइंड फ्रेंडली उपकरणे व मोबिलिटी प्रशिक्षण मिळाल्यास त्यांच्या जीवनाचा दर्जा सुधारून दृष्टीबधित देखील चांगले आयुष्य जगू शकतील असा विश्वास व्यक्त केला.आज खऱ्या अर्थाने दिव्यांग शब्द ज्यांना शोभावा अशा या दिव्यांगांनी आज आपल्या डोळस लोकांच्या डोळ्यात अंजन घातले आहे. साध्या साध्या गोष्टी साठी रडत ,कुढत बसणाऱ्या आपणाला आज प्रेरणा दिली आहे. प्थमेश व संपदा सारख्या दृष्टीबधितांसोबत

अगदी लहान वयात असणाऱ्या दृष्टीबाधीत बालकांसाठी आस्था लवकरच "मोबिलिटी ट्रेंनिग" सेंटर सुरू करत आहे. मागच्या वर्षी  रत्नागिरी जिल्हा नियोजन आराखड्यातील नावीन्यपूर्ण उपक्रमात निधी सह मंजूर असलेला हा उपक्रम आस्थाने सातत्याने पाठपुरावा करून देखील सुरू होऊ शकला नाही त्यामुळे या वर्षीच्या नियोजनात तो समाविष्ट करण्यासाठी आस्थाने पालकमंत्र्यांना निवेदन दिले आहे. निधी उपलब्ध होताच आपण , व्हाईट केन मोबिलिटी,मोबाईल,लॅपटॉप वापरणे ,सुरक्षित पाककला अंध क्रिकेट व असेच अनेक दृष्टीबाधीत दिव्यांगाना उपयुक्त उपकरणे वापर प्रशिक्षण सुरू करणार आहोत. अशी माहिती या निमित्ताने आस्था सोशल फाउंडेशन रत्नागिरी च्या वतीने सुरेखा पाथरे यांनी दिली.

Comments