मराठा आरक्षण देण्यासाठी ओबीसी आरक्षणाला धक्का लागता कामा नये

 


मराठा आरक्षण देत असताना ओबिसी आरक्षणाला धक्का लागता कामा नये. असे केल्यास ओबिसी प्रवर्गातील अनेक तरुणांवर बेरोजगारी, शिक्षण आदी क्षेत्रात फार मोठे नुकसान सोसावे लागेल. संपुर्ण राज्यात आजही अनेक ओबीसी समाजातील तरुण नोकरी नाही म्हणून दारोदार भटकत आहेत. मराठा समाजाला ओबिसीमध्ये आणल्यास ही परिस्थिती वाढेल. 

राज्य शासनाने होऊ घातलेल्या एम.पी.एस.सी. स्पर्धा परिक्षा तात्काळ रद्द करण्यात याव्यात. अन्यथा ओबिसी समाजाच्या वतीने अधिक तिव्र आंदोलन छेडण्यात येईल असा ईशारा आज ओबिसी समाजाच्या वतीने देण्यात आला. रत्नागिरी जिल्ह्यातील ओबिसी समाजाच्या वतीने रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयावर गुरुवारी आंदोलन छेडण्यात आले. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

Comments