शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या दापोली तालुक्यातील आशा स्वयंसेविकांवर होतोय अन्याय?


शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या दापोली तालुक्यात आशा स्वयंसेविकांवर अन्याय होतोय. माझे कुटूंब-माझी जबाबदारी या अभियानात अनेक अडचणी येत असून या अभियानाचे काम न करण्याचा ईशारा काही आशा स्वयंसेविकांनी लेखी पत्राद्वारे दिला आहे. 

दापोली-खेड-मंडणगड विधानसभा निवडणूकित आमदार योगेश कदम भरघोस मताधिक्याने निवडून आले. मात्र त्यांच्याच मतदारसंघात कार्यरत असलेल्या आशा स्वयंसेविकांवर अन्याय होत असून याबाबत तिव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. माझे कुटूंब- माझी जबाबदारी अभियानाचे काम करित असताना ऑक्सिमिटर बंद पडतात. टेंपरेचर तपासणीसाठी गन देण्यात आल्या त्या देखील बंद पडतात. सेल संपले तर वेळेत उपलब्ध होत नाहित. ग्रामपंचायती ऑक्सिमिटर वेळेत उपलबध करुन देत नाहित. गावात सर्वेक्षणासाठी गेल्यानंतर लोक शिव्या घालतात. गावात पाऊल ठेवू नये असे सांगतात. तब्बेत बरी नसली तरी देखील सर्वेक्षणासाठी जावे लागते. दिवसा लोक भेटत नाहित. दिवसा लोक मजुरिवर जातात. रात्रीचे सर्वेक्षण शक्य नाही. दिवसभर फिरुन देखील पुरेसे मानधन मिळत नाही. अशा तक्रारी या भागातील आशा स्वयंसेविकांनी व्यक्त करत तशा प्रकारच्या लेखी तक्रारी देखील वरिष्ठ अधिका-यांकडे सादर केल्या आहेत.

मुख्यमंत्री ऊद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून माझे कुटूंब-माझी जबाबदारी हे अभियान सुरु करण्यात आले. काही भागात हे अभियान चांगल्या पद्धतीने राबवले जात आहे. मग शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या दापोली तालुक्यातच आशा स्वयंसेविकांना हे अभियान राबवत असताना अडचणी का उद्भवत आहेत असा सवाल उपस्थीत केला जात आहे. खरे तर या अभियानाला शिवसैनिकांनी या अभियानात कार्यरत असणा-या प्रत्येक कर्मचा-याला सहकार्य करण्याचे आदेश देण्यात आले. मग दापोली तालुक्यात असे का घडत आहे असाही सवाल उपस्थीत केला जात आहे.

Comments