घाटकोपर पश्चिम येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जनसंपर्क कार्यालचे मंत्री नवाब मलिक यांच्या हस्ते उद्घाटन
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या घाटकोपर पश्चिम येथील प्रभाग क्रमांक १२३ च्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मुंबई अध्यक्ष नवाब मलिक यांच्या शुभ हस्ते करण्यातआले.
या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र उपाध्यक्ष शिवाजीराव नलावडे,ईशान्य मुंबई जिल्हाध्यक्ष धनंजय पिसाळ,महाराष्ट्र सरचिटणीस रवींद्र पवार,ईशान्य मुंबई निरीक्षक विलास माने,अल्पसंख्यांक विभाग मुंबई अध्यक्ष सोहेल सुभेदार,विद्यार्थी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष अमोल मातेले,मनोज व्यवहारे,विक्रोळी तालुका अध्यक्ष अब्दुल अन्सारी,मुलुंड तालुका अध्यक्ष अमित पाटील,घाटकोपर पूर्व अध्यक्ष बापू धुमाळे,युवक जिल्हाध्यक्ष भूषण शेलार घाटकोपर पश्चिम तालुक्यातील सर्व वार्ड अध्यक्ष सर्व फ्रंटलचे अध्यक्ष,सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते आदी उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे घाटकोपर तालुका अध्यक्ष सुरेश भालेराव आणि प्रभाग क्रमांक १२३ चे अध्यक्ष शंकर महाडिक यांनी केले होते.

Comments
Post a Comment