रत्नागिरी तालुक्यातील वरवडे गावात पणन महामंडळ, तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने मँगो नेट बाबत कार्यशाळा संपन्न

 


गुरुवार दिनांक २९/१०/२०२० रोजी मौजे वरवडे येथे मँगोनेट कार्यशाळेचे आयोजन कृषिविभाग आणि वरवडे गावचे ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. सदर कार्यशाळा ही शेतकऱ्यांच्या मागणीनुसार हंगामपुर्व घेण्यात आली. सदर कार्यशाळेला जिल्हा परीषदेच्या समाजकल्याण सभापती श्रीम. ऋतुजा जाधव, पंचायत मिती सदस्याश्रीम. मेघना पाष्टे, प्रादेशिक नारळ संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ. वैभव शिंदे, किटकशास्त्रज्ञ डॉ. संतोष वानखेडे, महाराष्ट्र राज्य पणन महामंडळाचे सहाय्यकसरव्यवस्थापक मिलींद जोशी, आत्माच्या प्रकल्प उपसंचालक श्रीम.उर्मिला चिखले, तालुका कृषि अधिकारी विनोद हेगडे व कृषि अधिकारी श्री. के. व्ही बापट हे उपस्थित होते. तसेच मोठया संख्येने परीसरातील आंबा बागायतदार व शेतकरी उपस्थित होते.

त्यावेळा डॉ. वैभव शिंदे यांनी आंबा कलमे जोपासना, बदलत्या हवामानाप्रमाणे बागांची मशागत, आंबा पुनरुज्जीवन याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. डॉ. संतोष वानखेडे यांनी आंबा मधील विविध किड रोग व त्यावरील उपाय याबाबत मार्गदर्शन केले. मिलींद जोशी यांनी मँगो नेट रजिस्ट्रेशन, जीआय मानांकन, काढणी पश्चात हाताळणी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. श्रीम.उर्मिला चिखले यांनी कृषि विभागाच्या विविध योजना, तसेच विकेल ते पिकेल या संकल्पनेबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाच्या वेळी नाना विचारे यांचा प्रगतशिल शेतकरी म्हणुन सर्व ग्रामस्थांकडुन सत्कार करण्यात आला. नाना विचारे यांनी उपस्थितांना अनुभव सांगीतले व मार्गदर्शन केले. जयवंत विचारे यांनी समुह शेती तसेच शेतकरी उत्पादक कंपनी यासंदर्भातील आपले अनुभव उपस्थितांसमोर मांडले. जिल्हा परीषदेच्या समाजकल्याण सभापती श्रीम. ऋतुजा जाधव यांनी विकेल ते पिकेल या संकल्पनेनुसार काम करणे काळाची गरज असल्याचे मत व्यक्त केले. पंचायत समिती सदस्या श्रीम. मेघना पाष्टे यांनीही शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे नियोजन गावातील सर्व ग्रामस्थ व मंडळ कृषि अधिकारी विनायक अवेरे, कृषि पर्यवेक्षक श्री. डी. एस. थोरात व मालगुंड मंडळ सर्व कर्मचारी यांनी केले.



Comments