जिल्ह्यातील अपंगाचे प्रश्न सोडवण्यासाठी पुन्हा कक्ष सुरु होणार

 


कोरोनामुळे अनेकांना त्रास सहन करावा लागला असताना शारीरिरीक अपंगत्व असणाऱ्या लोकांचे अनेक समस्या लॉक डाउनच्या काळात अपूर्ण राहिल्याने रत्नागिरी नगर परिषदचे नगरसेवक तथा नियोजन सभापती सोहेल मुकादम यांनी आज जिल्हा चिकित्सक संगमित्रा फुले यांची भेट घेऊन अपंग लोकांच्या समस्या मांडल्या त्यावर संगमित्रा फुले यांनी सहकार्य करण्याचा शब्द सोहेल मुकादम यांना दिला असून लवकर अपंग कक्षाचे बंद दरवाजे उघडले जातील अशी माहिती सोहेल मुकादम यांनी दिली आहे.

कोव्हील्ड 19 च्या काळात लॉक डाउन असल्याने अनेक प्रकरने बंद करण्यात आले होते.त्यामुळे अपंग लोकांची अनेक कामे थांबून राहिली होते.काही लोकांचे प्रमाणपत्र नूतनीकरण सुद्धा राहिले होते त्यामुळे त्या लोकांना पुढील कामांमध्ये अडचणी निर्माण होत होत्या .मात्र सामाजिक कार्यकर्ते रत्नागिरीचे नगरसेवक सोहेल मुकादम यांनी हा विषय जिल्हा चिकित्सक संगमित्रा फुले यांच्या समोर आणला आणि त्यावर सकारात्मक चर्चा करण्यात आली आहे.

सोशल डिस्टन्सचे पालन करून आठवड्यातील ठरलेले वारा प्रमाणे  फक्त 25 लोकांना बोलावून त्यांची अडचणी सोडवले जाणार असल्याचे सांगण्यात आले.त्यासाठी जिल्हा रुग्णालयात अपंग कक्षात  नोंदणी करावी लागणार आहे.नोंदणी नुसार ठरलेल्या वाराला लिमिटेड लोकांना बोलावले जाणार असल्याची माहिती सोहेल मुकादम यांनी दिली आहे.जिल्ह्यातील कोणत्याही अपंग व्यक्तीला, त्याच्या कामात अडचण आल्यास सोहेल मुकादम यांनी 9730228999 व  सादिक नाकाडे 8329534979 या नंबरला  स्वतःला सपंर्क करण्याचे आहवान केले आहे.

Comments