आ. शेखर निकम यांनी सोडवली आरवली भुवडवाडीतील ग्रामस्थांची पाण्याची समस्या
संगमेश्वर तालुक्यामधील आरवली भुवडवाडीतील ग्रामस्थांची पिण्याच्या पाण्याची समस्या आमदार शेखर निकम यांनी सोडवली असून ग्रामस्थांना बोअरवेल मारून दिली आहे. लॉकडाउनच्या आधी भुवडवाडीतील ग्रामस्थांनी आमदार शेखर निकम यांच्याकडे पिण्याच्या पाण्याची समस्या मांडली होती. आणि ती समस्या जलदुत म्हणून ओळख असलेल्या आमदार श्री शेखर निकम यांनी नुकतीच सोडवली आहे. ग्रामस्थांच्या सहभागातून बोअरवेल मारण्यात आली आणि त्यानंतर लागणारे सर्व उपकरणे म्हणजेच पाण्याचा पंप, मीटर व पाण्याची टाकी या गोष्टी त्यांच्या मार्फत देण्यात आल्या आहेत.
याच पाणी योजनेचे उद्घाटन विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर आमदार श्री शेखर निकम यांच्याहस्ते करण्यात आले. त्यावेळी मा.पं. स.सदस्य श्री सुरेश कांगणे, मुरडव सरपंच श्री कृष्णा मेणे, अक्षय चव्हाण ,स्वप्नील गुरव ,प्रवीण भुवड,शेखर उकार्डे ,अमोल नेटके तसेच त्या वाडीतील प्रमुख सदस्य श्री लक्ष्मण भुवड,महेंद्र भुवड,अनंत जुवळे,राकेश रामचंद्र भुवड ,दाजी भुवड,विजय भुवड आदी उपस्थित होते.

Comments
Post a Comment