चिपळूण न. प. इमारतीचे होणार स्ट्रक्चरल ऑडिट
महाडमधील इमारत दुर्घटनेनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी जुन्या व धोकादायक इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करून घेण्याबाबत दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी नगर परिषदेने सुरू केली आहे. त्यानुसार शहरातील १९९० ते २०१५ या कालावधीत बांधण्यात आलेल्या सुमारे ४९३ इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याबाबत संबंधितांना आदेश देण्यात आले आहेत तर शतकाच्या उंबरठ्यावर असलेल्या चिपळूण न.प. इमारतीचे देखील दुसऱ्यांदा स्ट्रक्चरल ऑडिट करण्याबाबत न.प. प्रशासनाने नियोजन केले आहे

Comments
Post a Comment