चिंचघरी येथील प्रौढाचा नदीत बुडून मृत्यू

 


चिंचघरी येथील ४९ वर्षीय प्रौढाचा सती टोलनाका येथील नदीपात्रात बुडून मृत्यू झाला. राजेंद्र पांडुरंग चाळके (रा. चिंचघरी-हनुमानवाडी) असे त्याचे नाव आहे. याबाबत अक्षय राजेंद्र चाळके यांनी चिपळूण पोलिसांत दिलेल्या खबरीनुसार ते दि. ५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजल्यापासून बेपत्ता होते. या प्रकरणी चिपळूण पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याची खबर देण्यात आली होती. दि. १४ रोजी सायंकाळी सती टोलनाका येथील नदीत त्यांचा मृतदेह आढळून आला. या प्रकरणी अधिक तपास पोलिस करीत आहेत.

Comments