उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याकडे कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्याची संपर्क मंत्री म्हणून जबाबदारी
राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या कामाचा धडाका, संघटन कौशल्य या गुणांचा विचार करून शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांची संघटनेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असलेल्या अशा कोल्हापूर आणि सातारा या दोन जिल्ह्यांसाठी संपर्क मंत्री म्हणून जबाबदारी दिली आहे.
या पूर्वी पुणे जिल्हा पिंपरी चिंचवड चे संपर्क प्रमुख म्हणून काम करताना साहेबांच्या कार्यक्षमतेची दखल संघटनेने घेतली होती.या वेळी संपर्क मंत्री म्हणून निवड होताच कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यातील सर्व कार्यकर्त्यानी आनंद व्यक्त केला आहे.

Comments
Post a Comment