भांडूपमध्ये इमारतीचा स्लॅब कोसळला,४ जखमी

 


बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या एस वार्डच्या अधिपत्यात येणाऱ्या भांडूप विभागातील डी ए व्ही कॉलेज समोरील इंद्रलोक सोसायटी मधील ‘बी’ विंग च्या दुसऱ्या माळ्याचा स्लॅब खाली आल्याने त्या घरातील चौघे किरकोळ जखमी झाल्याची दुर्घटना घडली आहे. त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांना जवळच्या रूग्णालयात त्यांच्यावर औषधोपचार सुरु करण्यात आले आहेत. सुदैवाने पहिला माळा आणि तळमजला येथील घरात कोणीही राहत नसल्याने कोणतीही जीवित हानी झाली नाही. 

सदर घटनेची माहिती मिळताच शिवसेना आमदार सुनील राऊत, नगरसेविका सुवर्णा करंजे आणि शिवसैनिक व पालिका अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला. इमारतीतील बाकी रहिवाश्यांचे स्थलांतर करून त्यांच्या राहण्याची सोय करून देण्यात आली असून कांजूर मार्ग पोलीस स्टेशन अधिकाऱ्यांना पुढील मदतीसाठी सुचना देण्यात आल्याची आमदार सुनील राऊत यांनी दिली. 

Comments