मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार
आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली वरळी पोलीस वसाहतीमधील ९ इमारतींची पुनर्बांधणी व ६० इमारतींचे दुरुस्ती व नूतनीकरण यासंदर्भात बैठक पार पडली. या कामासाठी मुख्यमंत्र्यांनी प्रस्ताव बनवून सादर करण्यास सांगितले आहे.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उचललेल्या या सकारात्मक पावलामुळे पोलीस वसाहतीत राहणाऱ्या पोलिसांच्या कुटुंबीयांना दिलासा मिळणार आहे. यावेळी मंत्री अनिल परब , सुनील शिंदे , सचिन अहिर , आशिष चेंबुरकर व सबंधित अधिकारी उपस्थित होते.

Comments
Post a Comment