सोने दरामध्ये घसरण कायम

 


अनलॉक-५ ची सरकारने घोषणा केली असली तरी कमॉडिटी बाजारावर फारसा परिणाम झालेला नाही. एकीकडे भांडवली बाजार तेजीत असला तरी कमॉडिटी बाजारात मात्र नफा वसुलीचा प्रभाव कायम आहे. आज गुरुवारी सोने आणि चांदीच्या किमतीत घसरण झाली आहे.

सध्या मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये सोन्याचा भाव १६४ रुपयांनी कमी झाला असून तो ५०१७० रुपयांवर आला आहे. चांदीच्या दरात देखील सकाळच्या सत्रात घसरण झाली होती. मात्र आता चांदीचा भाव सावरला आहे. चांदीचा भाव एक किलोला १४५ रुपयांनी वधारला असून तो ६००६४ रुपये झाला आहे.

जागतिक बाजारात आज सोन्याचा भाव १८८४.६७ डॉलर प्रती औंस झाला. चांदीचा भाव प्रती औंस २३.२५ डाॅलर आहे. याआधी ७ ऑगस्ट रोजी कमॉडिटी बाजारात सोन्याचा भाव ५६२०० रुपये प्रती १० ग्रॅम इतका विक्रमी स्तरावर गेला होता. मात्र जागतिक बाजारातील अस्थिरतेने सोने दरात ७००० रुपयांची घसरण झाली आहे. इतर चलनांच्या तुलनेत डॉलरचे मूल्य मजबूत होत असल्याने सोने आणि चांदीमध्ये घसरण झाली होती.]

goodreturns या वेबसाईटनुसार गुरुवारी मुंबईत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४८९०० रुपये आहे. २४ कॅरेटसाठी तो ४९९०० रुपये आहे. दिल्लीत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४८९५० रुपये आहे. तर २४ कॅरेटसाठी तो ५३४२० रुपये आहे. कोलकात्यात २२ कॅरेट सोन्याचा भाव ४९५६० रुपये आहे. तर २४ कॅरेटसाठी तो ५२४७० रुपये आहे. चेन्नईत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४८२५० रुपये आहे. तर २४ कॅरेटसाठी तो ५२६४० रुपये आहे.

शेअर बाजार ; सेन्सेक्स-निफ्टीची मोठी झेप

युरोपात करोनाची दुसरी लाट आल्याच्या भीतीने गुंतवणूकदारांची झोप उडाली आहे. यामुळे त्यांनी सोने आणि चांदीमधील गुंतवणूक काढून घेण्याचा सपाटा लावला आहे. परिणामी कमॉडिटी बाजारात या दोन्ही मौल्यवान धातूंच्या किमतींना उतरती कळा लागली आहे. आर्थिक अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर सुरक्षित गुंतवणूक म्हणून गुंतवणूकदार आणि मालमत्ता व्यवस्थापन करणाऱ्या वित्त संस्थांकडून सोन्यातील गुंतवणुकीला प्राधान्य दिले जाते.दसरा आणि दिवाळी महिनाभरावर असल्याने सराफांनी सोने खरेदीवर भर दिला आहे. त्यामुळे मागील आठवड्यात सोने आणि चांदीची मागणी वाढली असल्याने कमॉडिटी विश्लेषकांनी सांगितले.

Comments