जनजागृती सेवा समिती,महाराष्ट्र या सामाजिक संस्थेची स्थापना


समाजाच आपण काही देण लागतो, या एका आत्मियतेने, तळमळीने "जनजागृती सेवा समिती,महाराष्ट्र "या सामाजिक संस्थेची स्थापना घटस्थापनेच्या शुभ मुहूर्तावर केली गेलेली आहे. त्या अनुषंगाने संस्थापक-अध्यक्ष गुरुनाथ तिरपणकर यांनी खालीलप्रमाणे कार्यकारिणी जाहीर केलेली आहे. सचिव-संचिता भंडारी,उपसचिव-सौरभ टकले, खजिनदार-दत्ता कडुलकर,सहखजिनदार-श्रुती उरणकर,कार्यकारिणी सदस्य-एकनाथ गायकर,भावना परब,दीपक वांयगणकर,महेश्वर तेटांबे, मीनल गावडे,ममता तावडे.तसेच सल्लागार म्हणुन आत्माराम नाटेकर,बाळासाहेब सावंत,प्रदीप जोशी,गणेश हिरवे यांची नियुक्ती केलेली आहे. 

"जनजागृती सेवा समिती "या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून सांस्कृतिक, शैक्षणिक, पत्रकारिता,कला,क्रीडा,पत्रलेखन दीवाळी अंक स्पर्धा,आरोग्य,महिला दिन, महिला सक्षमिकरण अशा क्षेत्रात कार्यक्रम व उपक्रम राबविणे.तसेच अंध व अपंग विद्यालय,अनाथ बालकाश्रम,वृध्दाश्रम,वनवासी आश्रम अशा ठीकाणी भेटी देऊन त्यांना मदत करणे.तसेच समाजातील जेष्ठ व श्रेष्ठ प्रतिभावंत व्यक्तींच मार्गदर्शन घेतल जाईल.कुठल्याही संस्थेशी स्पर्धा न करता धिम्या गतीने का होईना संस्थेची वाटचाल चालु राहील.याप्रसंगी"जनजागृती सेवा समितीच्या नवनिर्वाचित कार्यकारिणीचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे.

टिप्पण्या