जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकारी इंदूराणी जाखडनी पद भार स्वीकारल्यावर अनेकांना लागला लगाम
रत्नागिरी जिल्हा परिषदचा कारभार धिम्या गतीने चालला असून येथे येणाऱ्या लोकांना चकरावर चकरा माराव्या लागत होत्या.अधिकारी व कर्मचाऱ्याकडून अनेकांना नाहक त्रास दिला जायचा मात्र जिल्हा परिषद मध्ये असणारी बेशिस्त कारभारात जिल्हा परिषदच्या नूतन मुख्यकार्यकारी अधिकारी इंदूराणी जाखड यांनी पदभार स्वीकारल्या नंतर अवघ्या दोन महिन्यातच अनेकांन अधिकारी कर्मचारी यांना वटनी वर आणल्याची चर्चा जिल्हा परिषद मध्ये सुरु आहे.
जिल्हा परिषदच्या कर्तव्यदक्ष मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी पदभार स्वीकारल्या नंतर जिल्ह्याचा आणि जिल्हा परिषदचा त्यांनी महिनाभर अभ्यास केला आणि नंतर त्या कामाला लागल्या.सकाळ पासून दिनक्रम सुरु झाल्यवर त्या उशिरा पर्यत थांबून जिल्हा परिषद मध्ये काम करत असतात.त्यांनी जिल्हा परिषदच्या काही बेशिस्त अधिकारीना चांगलेच वटणीवर आणले आहे.
जिल्हा परिषद सी.ई.ओ.च्या कारभार बगुन अनेक लोकप्रतिनिधीनी त्याचे कौतुक केले आहे.त्यांनी हळू हळू लोकांमध्ये जाऊन काम करण्यास सुरवात केली असून भ्रष्टाचार मुक्त असणाऱ्या या अधिकरी उशिरा का होई ना पण रत्नागिरीला मिळाले हें भाग्य समजावे लागेल.मात्र त्यांच्या नावाने खाणाऱ्याचा आढावा कधी घेणार हें पाहणे औचित्याचे ठरेल.त्याच्या कारभारा बाबत अनेक ठिकणी कौतुक केले जात असून येथील काही लेट लतिफना वेळेत येण्यासाठी आणि पैसे घेऊन काम करणाऱ्या कर्मचारीवर आपला शिस्त लावनार का हा ही एक प्रश्नच आहे.
सी.ई.ओ. मॅडम हे बदलेल का?
🎗️ लेट लतीफ वेळेवर येतील का?
🎗️ जिल्हा परिषदच्या काही विभागात होत असलेला भ्रष्टाचार थांबेल का?
🎗️ काम चुकार कर्मचारी व अधिकारी यांना शिस्त लागेल का?
🎗️ जिल्हा परिषद विभागाच्या विविध कामातील अधिकारी वर्गाची टक्केवारी बंद होईल का?
🎗️ जिल्हा परिषदच्या विविध योजना लोंकांपर्यत पोचतील का?
🎗️ लोकप्रतिनिधी आणि सर्वसामान्य जनतेशी बेशिस्त बगणाऱ्यांना धडा शिकवाल का?
जिल्हा परिषद विभागात अनेक ठिकाण भ्रष्टाचार आहेच मात्र बांधकाम विभागात मोठा भ्रष्टाचार असून टक्केवारी शिवाय पान हलत नाही.या विषयाची चोकशी करून नेमके काय चालाय ते जनते समोर आणण्याची मागणी होत असून फक्त बांधकाम नाही तर असे किती तरी विभाग आहेत की भ्रष्टाचाराच्या नावाने बरबटले आहेत.

Comments
Post a Comment