एसपी नी आदेश देताच जिल्ह्यात पाच ठिकाणी अवैध धंद्यांवर कारवाई



कोरोनाच्या काळातील निर्बंधांमुळे जिल्ह्यात अवैध धंद्यांवर नियंत्रण आले होते. मात्र अनलॉक प्रक्रियेच्या माध्यमातून जीवन पूर्वपदावर येताच अवैध धंद्यांना देखील सुरुवात झाली. याची दखल घेत जिल्हा पोलीस अधीक्षक मोहित कुमार गर्ग यांनी सर्व पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांना अवैध धंद्याविरुध्द कारवाई करण्याचे आदेश दिले होते. यानुसार मागील दोन दिवसात पाच ठिकाणी कारवाई करण्यात आली. 

देवरुख पोलीस ठाणे, पोलीस निरीक्षक निशा जाधव व पथक यांनी दि .०६ / १० / २०२० रोजी देवरुख पोलीस ठाण्याच्या हद्दीत बावनदी किनारी जंगलमय भागात, परशुराम वाडी, परिसरात आरोपी रामकृष्ण धोंडू लाड, वय ४९ वर्षे, रा.- परशुराम वाडी, देवरुख याने सुरु केलेली हातभट्टी दारु तयार करण्याचे भट्टीवर छापा टाकुन, एकुण रु .५,१०० / - किंमतीची हातभट्टीची दारु तयार करण्याचे साहीत्य व हातभट्टीची दारु व रसायन असा मुद्देमाल जप्त केला. 

रत्नागिरी शहर पोलीस ठाणे, पोलीस निरीक्षक अनिल लाड व पथक यांनी दि. ०६ / १० / २०२० रोजी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमेश्वर फाटा जवळ, पोमेंडी येथे आरोपी केतन जयसिंग पिलनकर, वय ४४ वर्षे, रा.- सोमेश्वर फाटा याच्या ताब्यातुन एकुण रु .१,७६६ / - किंमतीची विविध प्रकारची अवैध दारु जप्त केली. 

रत्नागिरी शहर पोलीस ठाणे, पोलीस निरीक्षक अनिल लाड व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शहा व पथक यांनी दि .०७ / १० / २०२० रोजी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मिरजोळे, पाटीलवाडी येथे आरोपी सुरेश रामचंद्र पारकर , वय ४५ वर्षे , रा.- उद्यमनगर, रत्नागिरी याच्या ताब्यातुन एकुण रु .२,२०० / - किंमतीची ४० लिटर हातभट्टीची दारु जप्त केली. 

पुर्णगड पोलीस ठाणे , पोलीस निरीक्षक सुरेश गावित व पथक यांनी दि .०७ / १० / २०२० रोजी पुर्णगड पोलीस ठाण्याच्या हद्दीत मेर्वी , महादेवाडी येथे आरोपी दिपक एकनाथ खरडे , वय ३४ वर्षे , रा.- मेर्वी याच्या ताब्यातुन एकुण रु .७१५ / - किंमतीची हातभट्टीची दारु जप्त केली.

चिपळुण पोलीस ठाणे, पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ व पथक यांनी दि .०७ / १० / २०२० रोजी चिपळुण पोलीस ठाण्याच्या हद्दीत पागनाका येथे पावर हाऊस मागे आरोपी सुचिता सुरेश सावंत वय ५३ रा.- पाग, पावर हाऊस मागे ता. चिपळुण जि. रत्नागिरी यांच्या ताब्यातुन एकुण रु .७५० / - किंमतीची हातभट्टीची दारु व इतर सामान जप्त केलेले आहे.


Comments