रत्नागिरीचे उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे व प्रविण पाटील यांची कोल्हापूर व हिंगोली जिल्ह्यात बदली

 


रत्नागिरीचे उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांची कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लजव उपविभागासाठी बदली करण्यात आली आहे. तसेच खेडचे उपविभागीय पोलिस अधिकारी प्रविण पाटील यांची हिंगोली जिल्ह्यातील बसमत उपविभागासाठी उपविभागीय पोलिस अधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे.

त्याचप्रमाणे चिपळूणचे उपविभागीय पोलिस अधिकारी नवनाथ ढवळे यांची ठाणे जिल्ह्यातील शहापूर विभागात बदली करण्यात आली आहे. महाराष्ट्र पोलिस अधिनियम १९५१ च्या कलम २२ (न) मधील तरतूदीनुसार या बदल्या करण्यात आल्या आहेत.

Comments