मुंबईतील संत गाडगे महाराज ट्रस्टच्या वतीने मुक्त पत्रकार , छायाचित्रकार व पत्रकारांना गृहउपयोगी वस्तूंचे वाटप

 

थोर समाजसुधारक संत गाडगे महाराज यांचे विचार आत्मसात करत समाजातील गरजूंना अन्न , वस्त्र आणि निवारा ही मानवसेवा लक्षात घेत मुंबईतील संत गाडगे महाराज ट्रस्टच्या वतीने आज परळ येथे ट्रस्टच्या कार्यालयात मुक्त पत्रकार , छायाचित्रकार व पत्रकारांना गृहउपयोगी वास्तूंचे किट वाटप करण्यात आले. यावेळी विश्वस्त हेमंत सामंत , प्रमोद सावंत , डॉक्टर रश्मी देसाई , आनंद बागवे आणि ईश्वर चराते हे उपस्थित होते. 

मुंबईतील गरजू अशा ४० पत्रकाराना हे वस्तू वाटप करण्यात आले. मुंबईत लॉकडाऊन सुरू झाल्यापासून सदर ट्रस्टच्या वतीने धारावी , उपनगर , आदिवासी पाडे भागात सॅनिटायझर व गरजूंना धान्य वाटप होत आहे. मानव सेवा हीच ईश्वर सेवा हे ब्रीद जोपासून ट्रस्टच्या वतिने हे कार्य केले जात असल्याचे ट्रस्टचे प्रमोद सावंत यांनी सांगितले.

Comments