जॉयच्या पुढाकाराने दानशूर व्यक्तींची दृष्टीहीनांना किराणा मदत
सामाजिक क्षेत्रात अग्रगण्य असणाऱ्या व लॉकडाउन काळात विविध माध्यमातून दानशूर व्यक्तींच्या सहकार्याने व आताही अनलोक सुरू असले तरी सामाजिक जबाबदारी ओळखून जॉय ऑफ गिविंग मुंबई या संस्थेने पुढाकार घेऊन आतापर्यंत जवळपास दोन हजार गोर-गरीब, वंचित व रोजंदारीवर काम करणारे कुटुंब,अनाथालय बालक,आदिवासी विद्यार्थी कुटुंब यांना किराणा किट, तसेच सानिटायझर, मास्क, आर्सेनिक गोळ्या, अल्पोपहार उपलब्ध करून देऊन मदत केलेली आहे व नुकतेच मुंबई व आसपासच्या विभागातील दृष्टीहीन कुटुंबाना किराणा (तांदूळ,डाळ,साखर,चहापावडर,पोहे,लापशी,गोडेतेल,मास्क, पॅराशूट ऑइल,कोलगेट व साबण ) किट देऊन सहकार्य करण्यात आले.
लॉकडाउन पूर्वीही कोरोना नव्हता तेव्हा संस्थेच्या माध्यमातून यापूर्वेही पालघर जिह्यातील अनेक आश्रमशाळा, तसेच अनाथालय, विविध वृद्धश्रम शैक्षणिक साहित्य व जीवनावश्यक किराणा मदत पोहचिण्यात आलेली आहे व भविष्यातही अशा गरजू लोकांना संस्थेच्या वतीने मदत करण्यात येईल असे यावेळी संस्थापक गणेश हिरवे यांनी सांगितले.दृष्टीहीनांना किराणा वाटप करण्यासाठी करण्यासाठी पश्चिम रेल्वेचे गुणवंत कामगार पुरस्कारप्राप्त मोटरमन चंद्रशेखर सावंत हे उपस्थित होते.
या उपक्रमासाठी विलास जावकर,अजित वैद्य,गणेश धनावडे,अभिजित पवार,कमलेश मर्द,कविता सांगळे, प्रवीण पवार,प्रभा सोलंकी,निलेश कानभार,मेघा अनावकर,सुभाष हांडेदेशमुख,रंजना ढवळे,सूर्यकांत सालम,सुरेश खटावकर,फिलिप रोड्रिक्स सर,घारे मॅडम,नीता कुलकर्णी मॅडम व गार्गी हिरवे यांनी सहकार्य केले अशी माहीती गणेश हिरवे(जोगेश्वरी पूर्व) यांनी बोलताना दिली.

Comments
Post a Comment