रातांबी गावठाणातील नागरी सुविधा कामांना प्राधान्य द्यावे - संतोष येडगे


संगमेश्वर तालुक्यातील राजिवली ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात १९८३ ला गडनदी प्रकल्पासाठी प्रथम प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती १९९५ च्या दरम्यान गडनदी धरण बांधकामाला गती मिळाली आणि २००९ ला धरणाची गळभरणी करुन पाणी साठवण्यात आले. सध्या धरणात ६४ द.ल.घ.मी एवढा पाणीसाठा उपलब्ध आहे. प्रकल्पग्रसतांच्या समस्या मार्गी लागाव्यात म्हणून प्रकल्पग्रस्तांकडून अनेकवेळा जिल्हाधिकारी कार्यालय तसेच पाटबंधारे कार्यालयात उपोषणे आणि विवध प्रकारची आंदोलने करण्यात आली. 

जलसंपदा विभागाकडून गडनदी बाधीत झालेल्या प्रकल्पग्रस्तांसाठी संगमेश्वर तालुक्यातील राजिवली घाडगेवाडी, शिर्केवाडी, काळंबेवाडी तर चिपळूण तालुक्यातील खेरशेत, नांदगाव  ही पाच पुनर्वसन गावठाणे तयार करण्यात आली आहेत यापैकी काळंबेवाडी पुनर्वसन गावठाणातील कामे प्रलंबित आहेत तर रातांबी गावाचे विशेष बाब म्हणून पुनर्वसन करण्यात यावे अशी सर्वपक्षीय नेत्यांची आणि स्थानिक प्रकल्पग्रस्तांची मागणी आहे.रातांबी गावठाणातील पुनर्वसन प्रश्नी आपण जलसंपदा विभागाचे प्रकल्प समन्वयक सचिव एन.व्ही.शिंदे यांची भेट घेऊन कामे मार्गी लावण्यासंदर्भात विनंती करणार असल्याचे संतोष येडगे यांनी यावेळी सांगितले

२९ नोव्हेंबर २००५ रोजी तत्कालीन जलसंपदा मंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीला प्रकल्पग्रस्तांचे नेतृत्व करणाऱ्या विविध संघटनांचे प्रतीनीधी उपस्थित होते या बैठकीत रातांबी पुनर्वसनाबाबात चर्चा करण्यात आली होती. बैठकीत तत्कालीन जलसंपदा मंत्री अजित पवार यांनी रातांबी गावठाणातील समस्यांबाबात कार्यवाही करुन अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते मात्र स्थानिक स्तरावरील पाटबंधारे मंडळाच्या अधिकाऱ्यांकडून दिरंगाई झाल्याने रातांबीचे पुनर्वसन कामे लांबणीवर पडली.

रातांबी हे गांव दोन्ही बाजूने कात्रीत सापडले असून एका बाजूने मोठा सह्याद्री तर दुस-या बाजुला गडनदी वाहते सद्यस्थितीत धरण असलेल्या गडनदी या मुख्य नदीने आपला प्रवाह बदलला असून गावाच्या दिशेने नदी वाहत आहे गडनदीने आपला प्रवाह बदलून गावाच्या दिशेने प्रवाहास सुरुवात केल्याने गावाची स्थिती कात्रीत अडकल्यासाखी झाली आहे. रातांबी गावाला जलसंपदाच्या यांत्रिकी विभागाकडून सपाटीकरण करुन देण्यासह प्रवाह बदलेल्या धरणाच्या मुख्य गडनदीसाठी धुपप्रतिबंधक आधारभींत बांधणे व अठरा नागरी सुविधांअंतर्गत नळपाणी पुरवठा योजना, अंतर्गत रस्ते, शेती पोहोच रस्ता आदी कामे करण्याची मागणी प्रकल्पग्रस्तांची आहे या मागणीकडे जलसंपदा मंत्रिलयाने गांभीर्याने विचार करावा.

नाही तर गावाला टेकलेल्या सह्याद्री च्या पोटात आम्ही माळीण सारखे गाडले जावू अन्यथा धरणाची मुख्य नदी असलेल्या गडनदीच्या पुरात वाहून जावू अशी भीती स्थानिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे तत्कालीन जलसंपदा मंत्री व राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निर्देशीत केल्याप्रमाणे रातांबी गावठाणातील कामांना चालना द्यावी या मागणीसाठी प्रकल्पग्रस्तांच्या वतीने संतोष येडगे हे जलसंपदा विभागाचे प्रकल्प समन्वयक सचिव एन.व्ही.शिंदे यांना पुनर्वसन गावठाणातील कामे मार्गी लावण्यासंदर्भात विनंती करणार आहेत.

महाराष्ट्रातील धरणांबाबत राज्य सरकारने आधी पुनर्वसन मग धरण हे धोरण निश्चित केले आहे.* राज्य सरकारच्या धोरणाला बगल देवून गडनदी धरण प्रकल्पाच्या कामाला सुरुवात करण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत मात्र जो पर्यंत प्रकल्पग्रस्तांच्या समस्या सोडवल्या जात नाहीत तो पर्यंत धरण कामाला हात लावून देणार नसल्याचा ठाम निर्धार प्रकल्पग्रस्तांनी केला आहे तर काळंबेवाडी आणि लांबणीवर पडलेल्या रातांबी गावच्या समस्या सोडवल्या गेल्या नाहीत तर प्रकल्पग्रस्त थेट मुंबईत आझाद मैदानावर धडक देवून उपोषण करतील असा इशारा प्रकल्पग्रस्तांच्यावतीने देण्यात आला आहे.

Comments