नवरात्रोत्सवात देवरूख सोळजाई मंदिर राहणार बंद
देवरुखची ग्रामदेवता श्री देवी सोळजाई मंदिर देवस्थानचा नवरात्रोत्सव यंदा कोरोना पार्श्वभुमीवरील शासनाने मंदीर खुली न केल्याने प्रशासनाने बंदी आदेशाचे पालन करणेसाठी बंद ठेवण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे. त्यामुळे नवरात्रोत्सव सूनासुना होणार आहे. शासनाच्या या आदेशाने नवरात्रोत्सवाची साडेतीनशे वर्षाची परंपरा यंदा प्रथमच खंडित होणार आहे.
देवरूखचे ग्रामदेवता व ४०गावची मालकीण असलेल्या देवी सोळजाईचे मंदीर नवरात्रोत्सव काळात म बंद राहणार असल्यामुळे अनेकांना केवळ कळसाचे दर्शन घेऊन समाधान मानावे लागणार आहे.
श्री देवी सोळजाई देवीचा नवरात्रोत्सव 17 रोजी घटस्थापनेपासून शनिवार 24 रोजीपर्यंत होणार आहे. यावेळी फक्त प्रहर नियोजन करण्यात आले आहे. देवरूख शहरातील वाडीवाडीतील ठराविक 4 ते 5 ग्रामस्थ प्रहरासाठी मंदिरात उपस्थित राहणार आहेत. असे नियोजन करण्यात आले आहे. भाविकांसाठी मंदिर बंद राहणार असल्याने विशेष करून महिला वर्गासाठी देवीची ओटी भरणे यंदा शक्य होणार नाही. त्यामुळे महिला वर्गात ह भाविकांच्या नाराजी पसरली आहे.
दरवर्षी नवरात्रोत्सवात सोळजाई ग्रामदेवता मंदिर गजबजलेले असते. भाविकांची गर्दी आणि होणारे कार्यक्रम यांची रेलचेल असते. यंदा मात्र कोरोनासंकटामूळे कुठले हि कार्यक्रम होणार नसल्याने भजनी, जाखडी व नमन कलाकारांसह सांस्कृतिक कार्यक्रमातील कलाकार यांना आपली कला सादर करता येणार नाही. त्यामुळे ते सर्व कलाकारही नाराज झालेले दिसत आहेत. शासन निर्णयाप्रमाणे देवस्थान मंडळ नियोजन करत आहे,
या पुर्वी शिमगा उत्सवाच्या शेवटच्या कालखंडात ही कोरानाला सुरूवात झाल्याने कडक नियमांची अंमलबजावणी करण्याचे प्रशासनाने दिलेल्या आदेशाचे पालन करणेसाठी प्रथा परंपरांना थांबवत पालखीसह सर्व कार्यक्रम रद्द करणेत आले होते. त्यावेळी नागरिकांनी देवस्थानला सहकार्य केले होते तसेच सहकार्य नवरात्रोत्सव हि करावे असे आवाहन देवस्थान मंडळाचे अध्यक्ष बापू गांधी या चेसह सर्व मानकरी व संचालक मंडळाने केले आहे.

Comments
Post a Comment