राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे करोनामुक्त


राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे करोनामुक्त झाले आहेत.एकनाथ शिंदे यांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. एकनाथ शिंदे करोनामुक्त झाल्यानंतर खासदार श्रीकांत शिंदे, पोलीस आयुक्त विवेक फडणसाळकर या शिवाय इतर पोलीस अधिकारी व शिवसेना पदाधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेतली. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर ते मुलासोबत घरी गेले. 

२४ सप्टेंबर रोजी एकनाथ शिंदे यांनी स्वतः ट्विट करुन त्यांची करोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याची माहिती दिली होती. एकनाथ शिंदे यांनी पीपीई किट्स घालून रुग्णालयांची पाहणी केली होती तरीही त्यांना करोना झाल्याने आश्चर्य व्यक्त होत होतं. दरम्यान त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. काही वेळापूर्वीच त्यांना डिस्चार्ज मिळाला आहे.

Comments