रत्नागिरीतील बर्फ कारखान्यांनी पाण्याची तपासणीच करुन घेतलेली नाही?

 


रत्नागिरी शहर व नजिकच्या ग्रामीण भागात असलेल्या काही बर्फ कारखान्यांनी पाणी नमुन्यांची तपासणीच केली नसल्याची बाब समोर येत आहे. शहरातील मांडवी येथील शासकीय पाणी तपासणी कार्यालयातून माहीती मिळाली आहे. तेथील अधिका-यांना माहीती विचारल्यानंतर लॉकडाऊन नंतर सुरु झालेल्या काही बर्फ कारखान्यांनी पाणी नमुने तपासूनच घेतले नसल्याची माहीती दिली आहे. 

या माहितीमुळे एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यासंदर्भात अन्न व औषध प्रशासन विभाग जाणिवपूर्वक डोळेझाल करित आहे का असा सवाल नागरीकांमधून उपस्थीत केला जात आहे. त्यामुळे यासंदर्भात राज्यस्तरीय सर्वेक्षण व्हावे अशा अपेक्षा जनतेमधून व्यक्त केल्या जात आहेत.

Comments