गाडी चालवताना खिशात लायसन्स नसेल तरी नो टेन्शन! आजपासून बदलला हा नियम
एखादं वाहन चालवताना तुम्हाला पोलिसांनी अडवलं आणि यावेळी तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स तुम्ही घरीच विसरला आहात, तर अजिबात घाबरायची गरज नाही. कारण आता लायसन्स बरोबर न बाळगल्याबद्दल पोलीस तुम्हाला दंड करू शकणार नाहीत. 1 ऑक्टोबर 2020 पासून देशात लागू होणाऱ्या कायद्यानुसार वाहन चालकाला त्याचं लायसन्स, गाडीच्या देखभालीची कागदपत्रं सोबत बाळगायची गरज नाही. परिवहन विभागाच्या वेबसाइटवर वाहन चालकाचं लायसन्स आणि गाडीसंबंधीची माहिती डिजिटल स्वरूपात अपलोड केली जाणार आहेत. त्याचबरोबर काही नियमभंगाबद्दल पोलिसांनी केलेली दंडाची पावतीही (ई-चलन) परिवहन विभागाच्या इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी पोर्टलवर उपलब्ध असेल.
केंद्र सरकाने कागदपत्र डिजिटायझेशनच्या सुरू केलेल्या योजनेअंतर्गत हे बदल केले जात आहेत. समजा तुम्हाला पोलिसांनी अडवलं तर ते या वेबसाइटवर जाऊन तुमचं लायसन्स, देखभालीची कागदपत्रं डिजिटल स्वरूपात तपासून बघतील. त्यामुळे या नव्या नियमानुसार ते या कागदपत्रांच्या छापील प्रतींची तुमच्याकडे मागणी करू शकत नाहीत. जर त्या अधिकाऱ्याने तुमचा परवाना रद्द केला किंवा त्यासंबंधी काही कारवाई केली तरीही ती अगदी तारीख, वार, वेळ, ठिकाणासह वेबसाइटवर नोंदवली जाणार आहे.

Comments
Post a Comment