पोफळी नाका येथून गुरांची वाहतूक करणारा टेम्पो जप्त; चौघांना अटक


पोफळी नाका येथे शिरगाव पोलिसांनी गुरांची चोरटी वाहतूक करणारा एक टेम्पो गुरांसह जप्त केला आहे. तालुक्यातील पेढांबे येथील एका व्यक्तीकडून दोन बैल खरेदी करून टेम्पो पोफळी मार्गे जात असताना सुनील जानू वरक यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी ही घटना शिरगाव पोलिसांना कळविताच पोलिसांनी तत्काळ दखल घेतली. या प्रकरणी बीड येथील जयराम तुकाराम वायगठ, संभाजी मालती मुळे, विश्वजित वालचंद्र गिले आणि शृंगारतळी येथील शौकत हबीब तांबोळी यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. 

यांनी पेढांबेतील एका व्यक्तीकडून दोन बैल खरेदी करून टेम्पो क्रमांक एमएच-२३एक्यू-२३२८ या गाडीने कुंभार्ली घाट मार्गे बीड येथे घेऊन जात असताना मंगळवारी मध्यरात्री तीन वाजण्याच्या सुमारास पोफळी नाका येथे ही गाडी अडविण्यात आली. या प्रकरणी पोलिस हवालदार कोळेकर तपास करीत असून टेम्पो व दोन बैलांसह चौघांना पोलिसांनी अटक केली आहे.

Comments